दोडामार्ग तालुका शिवसेना आणि शिक्षणमंत्री केसरकर यांच्या माध्यमातून वाटप
दोडामार्ग – वार्ताहर
दोडामार्ग तालुका शिवसेना आणि या भागाचे आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून दोडामार्ग बाजारपेठेतील व साटेली – भेडशी बाजारपेठेतील मच्छिविक्रेत्या महिला, भाजी विक्रेते व किरकोळ वस्तूंचा व्यापार करणाऱ्यांना आज मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या व्यापाऱ्यांनी मंत्री केसरकर यांचे तालुका पदाधिकाऱ्यांकडे आभार व्यक्त केले.
यावेळी तालुकप्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, विभागप्रमुख दादा देसाई, युवासेना तालुकाप्रमुख भगवान गवस, उपतालुकाप्रमुख तीलकांचन गवस यांसह रामदास मेस्त्री, लाडू आयनोडकर, शशिकांत गवस आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.









