Distribution of Ideal Journalist, Literary and Library Awards of Vengurle Municipal Library Society held
येथील नगर वाचनालया संस्थेतर्फे दिल्या जाणाऱया आदर्श पत्रकार, आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता, साहिित्यक, व आदर्श ग्रंथालय कर्मचारी या पुरस्काराचे वितरण रविवारी नगर वाचनालय संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा नगरवाचनालय संस्थेचे उपाध्यक्ष अँङ देवदत्त परूळेकर यांच्या हस्ते रोख रक्कम, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्माचिन्ह व पुष्पगुच्छ प्रदान करून झाले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 14 ते 28 जानेवारी याचे औचित्य साधून येथील नगरवाचनालय संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कोरगांवकर सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमांत व्यासपिठावर उपस्थित मान्यवरांत पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा नगरवाचनालय संस्थेचे उपाध्यक्ष अँङ देवदत्त परूळेकर, कार्याध्यक्ष अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार, आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त पत्रकार दै. तरुण भारत, सावंतवाडी मधील जिल्ह्याचे डेस्क इंन्चार्ज अवधूत मधुकर पोईपकर, मालवण येथील `आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार गजानन सीताराम वालावलकर, वेंगुर्लेतील साहित्यिक पुरस्कार वीरधवल नारायण परब, कुडाळ येथील आदर्श ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार राजन महादेव पांचाळ आदींचि समावेश होता.
यावेळी अन्य उपस्थित मान्यवराऔत नगरवाचनालय संस्थेचे कार्यकारीणी सदस्य नंदन वेंगुर्लेकर, महेश बोवलेकर, सदानंद बांदेकर, बंटी बिजीतकर, श्रीनिवास सौदागर, सौ. प्रमिला पाईपकर, सौ. पांचाळ, वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, ग्रंथपाल गुरूदास मळीक, कर्मचारी किशोर सावंत, पुजा धावडे, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, साप्ताहिक किरातचे सहसंपादक सुनिल मराठे यासह पालक व विद्यार्थी यांचा समावेश होता.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष देवदत्त परूळेकर यांनी, वाचाल तर वाचाल हे ब्रीद आजच्या काळात फार महत्वाची आहे. पालकांनी आपल्या पाल्यांचा व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना घडविताना त्यांच्या अंगातील कलागुणांनुसार पुढील विकासाचे संकेत लक्षात घेऊन त्या कलागुणांना विकसीत करण्यासाठी विषयांचे वाचन पुस्तकांच्या माध्यमातtन व्हावे. त्या विषयाचे प्रगल्भ ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे. यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी वाचनालयातील पुस्तकांचा शालेय वेळे खेरीज अवांतर वेळेत करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे. त्यातून ते आपल्या क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करतील. व त्यांची दखलही त्या क्षेत्रात घेतली जाईल असे स्पष्ट केले.
सावंतवाडी / प्रतिनिधी