सावंतवाडी प्रतिनिधी
पत्रकार सर्वाच्या मदतीला जातात अनेकांना सहकार्य करतात परंतू त्यांच्या मदतीला कोणीही धावून येत नाही रोटरी क्लब व नॅबच्या माध्यमातून चष्मे देण्यासाठी राबविण्यात आलेला उपक्रम कौतूकास्पद आहे. आम्ही पत्रकार त्यांचे कायमचे ऋणी राहू असे मत जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी आज येथे व्यक्त केले.
सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, रोटरी क्लब सावंतवाडी, मुक्ता ऑप्टिशन, नॅब असोशिएशन आणि दत्तगुरु डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विदयमाने सावंतवाडीतील पत्रकारांना आज चष्म्याचे वाटप करण्यात आले. या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानी बोलत होते. यावेळी नॅबचे अध्यक्ष अनंत उचगावकर,रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी चे अध्यक्ष सुहास सातोसकर माजी अध्यक्ष डॉ विनया बाड, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक,जेष्ठ पत्रकार अण्णा केसरकर,डीजीटल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर,जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार संतोष सावंत,,सचिव मयुर चराठकर, तालुका संघाचे खजिनदार रामचंद्र कुडाळकर उपाध्यक्ष दीपक गावकर सदस्य राजू तावडे ,नरेंद्र देशपांडे ,शैलेश मयेकर,भुवन नाईक,नितेश देसाई,प्रसाद माधव,मंगल नाईक ,उमेश सावंत,रोटरीचे सचिव प्रवीण परब माजी सचिव दिलीप म्हापसेकर प्रमोद भागवत,माजी नगरसेविका दिपाली भालेकर मिहिर मठकर आदी उपस्थित होते .
यावेळी श्री लोंढे पुढे म्हणाले या ठीकाणी पत्रकारांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता याला चांगला प्रतिसाद लाभला एखादी सामाजिक संघटना पत्रकाराच्या मदतीसाठी येते हे कौतूकास्पर आहे .असेच सहकार्य पुढे करण्यात यावे असे ते म्हणाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात हरिश्चंद्र पवार यांनी या नेत्र तपासणी शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे नेत्र तपासणी करून चाळीस जणांना चष्म्याचे वाटप करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 30 चष्मे देण्यात येत आहेत तर 75 हुन अधिक जणांनी नेत्र तपासणी केली पत्रकारांना दृष्टी देण्याचे काम या सेवाभावी संस्था नी केल्याबद्दल त्यांनी या सेवा संस्थांचे ऋण व्यक्त केले.
यावेळी डॉ बाड म्हणाल्या सामाजिक काम करीत असताना काम आम्ही काही तरी पत्रकारांचे देणे लागतो या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. होता कार्यकाळ संपताना असा उपक्रम राबविता याचा मला अभिमान आहे . सातोसकर म्हणाले या ठीकाणी रोटरीच्या माध्यमातून भविष्यात खास पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्याचा आमचा मानस आहे लवकरच हा कार्यक्रम घेण्यात येईल त्यासाठी आवश्यक असलेले सहकार्य आम्ही नक्कीच करू असे आश्वासन दिलेतर सूत्रसंचालन आणि आभार संघाचे सचिव रामचंद्र कुडाळकर यांनी मानले यावेळी उपस्थित पत्रकारांना चष्म्याचे वाटप करण्यात आले.









