न्हावेली / वार्ताहर
मळेवाड – कोंडुरे ग्रामपंचायततर्फे गावातील गरजू लाभार्थी महिलांना उज्वला गॅसची ११ कनेक्शन वितरीत करण्यात आली आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरजू लाभार्थी महिलांना माफक दरात गॅस कनेक्शन मिळावे,यासाठी उज्वला गॅस योजना सुरु करण्यात केली या योजनेंअंतर्गत ग्रामपंचायत मळेवाड – कोंडुरेकडून गावातील ११ गरजू लाभार्थी महिलांना उपसरपंच हेमंत मराठे यांच्या सहकार्याने उज्वला गॅस कनेक्शन वितरीत करण्यात आली आहेत.यापूर्वीही मराठे यांच्या सहकार्याने गावातील १५ महिलांना उज्वला गॅस कनेक्शन योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला होता.या वितरण प्रसंगी सरपंच सौ.मिनल पार्सेकर उपसरपंच हेमंत मराठे यांच्यासह ग्रामस्थ व लाभार्थी कुटुंबीय उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









