गणेश चतुर्थीसाठी दिपक केसरकर मित्रमंडळातर्फे आयोजन
वेंगुर्ले (वार्ताहर)-
दीपक केसरकर मित्रमंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे तालुक्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या गोरगरिबांना तसेच मच्छीमार, कातकरी, गवळी, धनगर व मागासवर्गीय वसाहतीतील सर्वांना गणेश चतुर्थीसाठी गणेशाच्या पुजनास लागणारे पूजा साहित्य व गोड पदार्थ बनविण्यासाठीचे साहित्य आणि शासनाच्या आनंदाच्या शिद्याचे वाटप गणेश चतुर्थी सणापुर्वी पोहोचवण्याचे काम शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते युद्ध पातळीवर काम करीत आहेत. आज गुरुवारी व उद्या शुक्रवारी उभादांडा आणि शिरोडा गावात हे साहित्य वाटप व शासनाच्या आनंदाच्या शिद्याचे वाटप ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयाच्या ठिकाणी केले जात असून यापासून सर्वसामान्य चुकून राहू नये. यासाठी या गावातील सर्वसामान्य नागरिकांनी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. असे आवाहन वेंगुर्ले तालुका शिवसेना प्रमुख नितीन मांजरेकर यांनी केले आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावतीने दिपक केसरकर मित्रमंडळाने गणेश चतुर्थी सण हा या भागातील सर्वात मोठा व उत्साहात साजरा केला जाणारा सण आहे. या सणासाठी सर्वसामान्य आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या तसेच मच्छीमार, मागासवर्गीय, कातकरी, धनगर, गवळी वसाहत असलेल्या भागातील जनतेला गणेश पूजनासहित गोड पदार्थ बनविण्याचे साहित्य असलेल्या पिशव्यांचे व शासनाच्या आनंदाचा शिद्याचे वाटप कार्यक्रम शिवसेना पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामार्फत करण्याच्या घेतलेल्या निर्णयानुसार शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, वेंगुर्ले तालुका शिवसेना प्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हा प्रमुख सचिन देसाई, सुनिल मोरजकर, तालुका समन्वयक बाळा दळवी, शहर शिवसेना प्रमुख उमेश येरम, युवा सेना शहर प्रमुख संतोष परब, मच्छीमार तालुका सेल प्रमुख गणपत केळुसकर, प्रकाश मोठे, कौशिक परब, उपतालुकाप्रमुख, दिलीप मठकर, राजन गावडे, दत्तगुरु परब, दाय मांजरेकर, शिरोडा विभाग प्रमुख अमित गावडे, सुधीर धुरी, बाळू सावंत, तुळस विभाग प्रमुख संजय परब, सुनील तुळसकर, रवी केळूसकर, देवा कांबळी, जगदीश परब, वासुदेव कोंडये, अण्णा वजराटकर, सुरेंद्र वारंग, पाल उपसरपंच प्रीती गावडे, कोचरा सरपंच योगेश तेली भोगवे सरपंच श्री वायंगणकर आडेली सरपंच यशस्वी कोंडस्कर, होडावडा सरपंच रसिका केळुसकर, सागरतीर्थ सरपंच एकनाथ कुडव, पेंडूर सरपंच गीतांजली गावडे, मातोंड सरपंच जान्हवी परब यासह अन्य पदाधिकारी यांनी तालुक्यात ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालय येथे गणेश पुजा साहित्य व शासनाच्या आनंदाच्या शिद्याचे रात्री रेशन कार्डच्या माध्यमातून वाटपाचे नियोजन गावागावातील कार्यकर्त्यांच्या सहभागातून केलेले आहे. त्यानुसार युद्ध पातळीवर गणेश पूजना सहित गौडपदार्थ बनविण्याचे साहित्य असलेल्या पिशव्यांचे वाटप व शासनाच्या आनंदाच्या शिद्याचे रेशनकार्ड मार्फत वाटप केले जात आहे. आजपर्यंत सुमारे 5 हजार कुटुंबांना हे वाटप करण्यात आल्याचे केसरकर मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.









