प्रतिनिधी/ बेळगाव
मच्छे गावातील म. ए. समितीच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी वटपौर्णिमा पूजनाच्या जागी ठेवलेली प्रसादरुपी फळे संकलित करून ती भुकेलेल्या बालक व अनाथ व्यक्तींना वितरित केली.
या उपक्रमासाठी म. ए. समितीच्या कार्यकर्त्या रेणुका भोमाणी लाड, मालती मालोजी लाड, रमा शाम बेळगावकर, रेखा जयपाल लाड, प्रियांका बजरंग धामणेकर, वीणा गजानन छप्रे, शारदा परशराम कणबरकर यांनी परिश्रम घेतले.









