स्व. मधुसूदन सावंत ट्रस्टतर्फे राबविला उपक्रम
म्हापसा : स्व. मधुसूदन सावंत ट्रस्ट, साळगावतर्फे साळगाव पंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोफत बियाण्यांचे नुकतेच वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साळगावचे सरपंच लुकास रेमेडीयस, प्रा. दिलीप धारगळकर, पत्रकार प्रदीप पाडगांवकर, दया मोरजकर तसेच स्व. मधुसूदन सावंत ट्रस्टचे प्रमुख प्रदीप सावंत उपस्थित होते. गेल्या काही वर्षांपासून या ट्रस्टतर्फे साळगाव पंचायत क्षेत्रातील गरजू शेतकऱ्यांना संकरीत बियाणे वाटप करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. सरपंच लुकास रेमेडीयस यांनी आजच्या काळातफायद्यासाठी शेती न करता पर्यावरण रक्षणासाठी शेती लागवडीखाली आणावी, असे आवाहन केले. प्रा. दिलीप धारगळकर यांनी आत्मिक समाधानासाठी शेती करावी, असे सांगितले. प्रदीप पाडगांवकर, दया मोरजकर यांचीही समयोचित भाषणे झाली. सरपंच लुकास रेमेडीयस व अन्य मान्यवरांच्याहस्ते शेतकऱ्यांना संकरीत बियाणे वाटप करण्यात आले. प्रदीप सावंत यांनी आभार मानले.









