प्रतिनिधी /बेळगाव
लोककल्प फौंडेशनने हंदिकोप्पवाडा येथील मुलांना शालेय पुस्तकांचे वाटप केले. पुस्तके आणि शाळेतील स्टेशनरीसारख्या सर्व आवश्यक गोष्टींचे वाटप करण्यात आले. हंदिकोप्पवाडा हे बेळगावातील कणकुंबी परिसरातील घनदाट जंगलात वसलेले गाव आहे. हे गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे.
लोककल्प फौंडेशनने संस्थापक किरण ठाकुर आणि अध्यक्ष अजित गरगट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गम भागातील 32 गावे दत्तक घेतली आहेत. शाळेचे मुख्याध्यापक, कर्मचारी व लोककल्प स्वयंसेवक सुहासिनी पेडणेकर आणि वामन पेडणेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.









