सावंतवाडी कृषी विभागाचे आयोजन
ओटवणे प्रतिनिधी
सावंतवाडी कृषी विभागाच्यावतीने केसरी येथील शेतकऱ्यांना खते बियाणे व भरड धान्य वितरीत करण्यात आले. यावेळी खते व बियाण्याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी केसरी सरपंच स्नेहल कासले, उपसरपंच संदीप पाटील, तलाठी सचिन चितारे, कृषी सहाय्यक सविता घेरडे, ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ कासले, कृषिमित्र प्रदीप सावंत, प्रदीप भोसले, माजी उपसरपंच भरत गोरे, अँड प्रितेश सावंत, भिवा सावंत, दिपाली गोरे, सुष्मिता नाईक, सरीता गावडे, सुनिता गावडे, श्रीकृष्ण सावंत, मंतेश नाईक, अतुल सावंत, तुकाराम सावंत, सिताराम सावंत, सखाराम खरात, अशोक कासले, कृष्णा कासले आदी ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.









