राज्यशासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाने पुरवठा केलेल्या इलेक्ट्रिक (E-Vehical) घंटागाडीचे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद सातारा यांच्या हस्ते ग्रामपंचायतीना लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी कुडाळ, ता.जावली तर सातारा तालुक्यातील ग्रामपंचायत लिंब अतीत,खेड,धनगरवाडी (कोडोली),नागठाणे या ग्रामपंचायतीना इ-घंटागाडीचे वितरण करण्यात आले. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय लाड,सहा.प्रशासन अधिकारी श्री.सुनील रांजणे, ग्रामपंचायत कुडाळ ता.जावलीचे सरपंच श्री.विरेंद्र शिंदे,जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन काक्षाचे जिल्हा तज्ञ रविंद्र सोनावणे उपस्थित होते. राज्य शासनाने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्य स्तरावरून ६ इ-घंटागाडीचे वितरण करण्यात आलेले होते. सदर वाहनांची मा. याशनी नागराजन मॅडम यांनी ई घंटागाडीची तांत्रिक दृष्टया पाहिणी केली यामध्ये कच-याचे डंपिंग व्यवस्थित होते आहे काय? बॅटरीचे चार्जिंग होते काय अशा विविध तांत्रिक बाबींची पहानी केली.
स्वच्छ भारत मिशन ग्रा. टप्पा-२ अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनसाठी गावस्तरावर नॅडेफ गांडूळखत प्रकल्प इ. यंत्रणा उभारण्यात आलेल्या आहेत.सदर प्रकल्पामध्ये प्रत्येक घरातून तयार होणारा घनकचरा हा वर्गीकरण करून त्याचे खतात रुपांतर होण्यासाठी कच-याचे प्रकल्पापर्यंत वाहतुक होण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून इ-घंटागाड्या पुरवण्यात आलेल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील १७४३ गावांपैकी १३०७ गावांमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यव्स्थापनाची कामे पुर्ण झालेली आहेत. सदर गावांपैकी ५००० लोकसंख्येवरील बाजारपेठांच्या ९४ ग्रामपंचायतींना टप्प्या टप्प्याने राज्य शासनाकडून इ-घंटागाडी देण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत ज्या गावांचा राज्य हिस्स्यातील ७० टक्के शिल्लक निधितुन पहिल्या टप्प्यात ९४ ई घंटागाडया व ३११ ट्रायसायकल राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागा मार्फत ग्रामपंचायतींना वितरीत करणेत येणार आहे. सदर वाहनांच्यामुळे घनकचरा व्यव्स्थापनाच्या प्रकीयेस गती येणार आहे.या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी बोलताना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम याशनी नागराजन म्हणाल्या की, ग्रामपंचायतींना या पद्धतीच्या इ-घंटागाड्यांच्या मुळे घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेस गती येणार आहे. तसेच इ-घंटागाड्यामुळे ग्रामपंचायतीच्या इंधनाच्या खर्चास कपात होणार आहे.या पर्यावरण पुरक इ-घंटागाडीमुळे हवेचे प्रदूषण होणार नाही.या पद्धतीच्या इ-घंटागाड्या स्व निधीतून किव्हा वित्त आयोगातून खरेदी कराव्यात व योग्य प्रकारे घनकचरा व्यवस्थापन करावे.
या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे तज्ञ ऋषिकेश शिलवंत,अजय राऊत,गणेश चव्हाण,निलिमा सन्मुख,फिरोज शेख,साकेत महामुलकर,विशाल भिसे,सविता भोसले,कोमल पाटील,सचिन जाधव तर तालुका स्तरावरील पाणी व स्वच्छता कक्षाचे अमित गायकवाड,संतोष जाधव,प्रियांका देशमुख,प्रथमेश वायदंडे,फिरोज मुलाणी,मनोज खेडकर उपस्थित होते.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत ज्या गावांचा राज्य हिस्स्यातील ७० टक्के शिल्लक निधितुन पहिल्या टप्प्यात ९४ ई घंटागाडया व ३११ ट्रायसायकल राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागा मार्फत ग्रामपंचायतींना वितरीत करणेत येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील घनकच-याचे योग्य व्यवस्थापन योग्य रित्या होण्यास मदत होणार आहे.