ओटवणे / प्रतिनिधी
बावळाट ग्रामस्थ मंडळ (मुंबई) चा उपक्रम
Distribution of educational materials to the students of Bavalat village!
मुंबईस्थित बावळाट ग्रामस्थांच्या बावळाट ग्रामस्थ मंडळ (मुंबई) च्यावतीने बावळाट येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.यावेळी बावळाट ग्रामस्थ मंडळ (मुंबई) चे माजी सचिव बाबु सावंत, बावळाट तंटामुक्ती समिती अध्यक्ष उत्तम परब, पोलीस पाटील आबा परब, अँड विठ्ठल परब, बावळाट प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री देसाई, श्री धुरी, सौ सानप आदीसह पालक उपस्थित होते.यावेळी बावळाट ग्रामस्थ मंडळ (मुंबई) चे माजी सचिव बाबु सावंत यांनी मंडळाच्यावतीने यापुढेही बावळाट गावाच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बावळाट ग्रामस्थ मंडळ (मुंबई) चे आभार मानले.









