प्रतिनिधी /बेळगाव
महिला विद्यालय हायस्कूलतर्फे शतक महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. 35 विद्यार्थिनींना गणवेशाचे कापड, 36 विद्यार्थिनींना वहय़ा व 29 विद्यार्थिनींना स्कूल बॅग देण्यात आल्या. मुख्याध्यापक व्ही. एन. पाटील, ज्ये÷ सहाय्यक शिक्षक के. एन. पाटील, रेखा नागण्णावर, एस. व्ही. बनसूर यांच्या हस्ते विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.









