बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने खानापूर तालुक्यातील जांबोटी, कणपुंबी, बैलूर विभागातील विविध शाळांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन तसेच दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळावे, या दृष्टीने महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने उपक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समितीचे नेते किरण गावडे उपस्थित होते. जांबोटी विभागातील आमगाव, आमटे, चापोली, चिरेखाणी, गवसे, हब्बनहट्टी, जांबोटी, कालमणी, ओलमणी, वडगाव, विजयनगर, कणपुंबी विभागातील बेटणे, हुळंद, पारवाड, चिखले, चोर्ला, माण, कणपुंबी, चिगुळे, हंदीपकोपवाडा, बैलूर विभागातील तळावडे, गोल्याळी, तीर्थकुंडये, बैलूर, मोरब, तोराळी, सोनारवाडी, कौलापूर, बेटगिरी, गावळीवाडा, उचवडे, देवाचीहट्टी, कुसमळी या शाळांमध्ये उपक्रम राबविण्यात आला.
जांबोटी येथील केंद्र शाळेत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी प्राथमिक शाळेत जांबोटीचे एसडीएमसी अध्यक्ष महेश जांबोटकर होते. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी विठोबा दळवी, पी. एस. गुरव, भरणकर, देवगेकर, रमेश गावडे, वैशाली घाडी यासह इतर उपस्थित होते. सुरेश गावकर यांनी सूत्रसंचालन केले. कणपुंबी येथे किरण गावडे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वितरण झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शहाजिद मुल्ला, बिर्जेसर, युवा समितीचे उपाध्यक्ष राजू कदम, सरचिटणीस श्रीकांत कदम, सूरज कुडूचकर यासह इतर उपस्थित होते. बैलूर विभागाचे शैक्षणिक साहित्याचे वितरण कुसमळी शाळेत झाले. यावेळी प्रल्हाद पाटील, एम. के. पाटील यासह इतर उपस्थित होते.









