आचरा प्रतिनिधी
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शिवकृपा युवा मंडळ आचरा पारवाडीच्या वतीने दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी सर्व विध्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक आणि वह्याचा संच देत त्यांचे कौतुक केले. सुरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी त्यांनी सर्व गुणवंत विध्यार्थ्यांना शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास शिवाकृपा युवा मंडळाचे अध्यक्ष श्री. मिलिंद मुळये, उपाध्यक्ष श्री. सचिन परब, सचिव श्री. केदार शिर्के/हरेश शेट्ये तसेच ब्राम्हणदेव सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री. मुकेश सावंत, उपाध्यक्ष बळीराम वायंगणकर, सचिव श्री. अनिकेत मांजरेकर/प्रशांत परब व्यासपीठावरील मान्यवर श्री. दिपक गावडे, श्री. राजा जोशी, श्री. अंकुश परब आणि वाडीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्तित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.









