न्हावेली / वार्ताहर
मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव मध्ये गुरुवर्य गुरुनाथ पाटकर प्रतिष्ठान त्याचप्रमाणे हरिषरावजी दमळगावकर ,सौ वंदना सागर तावडे, श्री नंदकुमार प्रभू देसाई ,श्री आनंद राजाध्यक्ष, माजी मुख्याध्यापक व्हि टि .देवण वरिष्ठ लिपिक भालचंद्र गोसावी, अविनाश बेळेकर ,सौ, स्वपनल लुमाजी मॅडम ,मनीषा राधाकृष्ण नाटेकर, श्री नंदकुमार प्रभू देसाई ,माजी मुख्याध्यापिका राणे मॅडम, श्री वैशाली गुडेकर, श्री प्रशांत राऊत तसेच शिक्षक वर्ग इतर दानशूर व्यक्तीने संस्थेकडे दिलेल्या किंवा ठेवलेल्या ठेवीच्या व्याजातून दिलेल्या देणगीतून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेश व शैक्षणिक साहित्य वितरित केले जाते या कार्यक्रमाला म्हापसा गोवा येथील प्रा. अनिल सामंत, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते ते म्हणाले की मी येथे साहित्याचे वितरण करायला येत नाही तर मी माझे मामा गुरुवर्य पाटकर यांचे विचार प्रेरण्यासाठी येतो त्याचबरोबर प्रमुख वक्ते प्रा रमेश सप्रे सर म्हणाले की अभ्यास एक झाड आहे हे स्पष्ट करून अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन केले त्त्यांनी मुलांना सांगितले की तुम्ही पैशाची जशी गुंतवणूक करतात त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या वेळेची गुंतवणूक करा तुम्ही हा विचार करा की मी माझ्या आई-वडिलांना समाधान देईल व शिक्षकांना अभिमान देईल .
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री फाले सर यांनी केले तर सूत्रसंचालन व्ही .आर. सावंत यांनी केले. आभार पर्यवेक्षक कदम सरांनी केले या कार्यक्रमाला म्हापसा गोवा येथील प्रा.अनिल सामंत,प्रा.रमेश सप्रे, दीपक मणेरिकर ,स्कूल कमिटी चेअरमन मा.मनोहर राऊळ, माजी मुख्याध्यापक मुळीक सर ,स्कूल कमिटी सदस्य दीपक जोशी ,संस्था संचालक केळुस्कर उपस्थित होते व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते