बेळगाव : वारा आणि पावसाची पर्वा न करता शहर स्वच्छतेचे काम करणाऱ्या मनपा सफाई कर्मचाऱ्यांना समाजसेविका माधुरी जाधव यांनी आपल्या आई वासंती रामा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नुकतेच ब्लँकेटचे वितरण केले. बेळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी वातावरणात प्रचंड गारठा निर्माण झाला असून थंड वारे वाहू लागले आहेत. मात्र पावसासह थंडीच्या लाटेतही सफाई कर्मचाऱ्यांना शहरातील कचरा संकलनाचे काम करावे लागते. तेव्हा त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून माधुरी जाधव फौंडेशनतर्फे ब्लँकेट देण्यात आले.
Previous Articleशहापूर परिसरातील जुने वीजखांब हटविले
Next Article मनपा स्थायी समितीच्या अध्यक्षांना मिळाले कक्ष
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









