वेंगुर्ले (वार्ताहर)-
सिंधुभूमी फाऊंडेशन शिरोडा या संस्थेच्यावतीने महालक्ष्मी अँग्रो प्रॉडक्टस, पाल- वेंगुर्लेचे संचालक अंकुश गावडे आणि किरण इलेकट्रिकल्सचे किरण पालयेकर यांच्या सहकार्याने सखैलेखोल-सागरतीर्थ येथील गरजू, होतकरू शाळकरी मुलीना सायकल वाटप सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, आरवली सरपंच तातोबा कुडव, आरवली उपसरपंच किरण पालयेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरवली ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच किरण पालयेकर यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झांटये यानी सर्वांचे स्वागत केले. व सदर उपक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमास सखेलेखोल येथील माजी शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते सुरेश झांटये, उमेश मंत्री, महेश गोडकर, अक्षता दिपाजी, कल्पना दिपाजी, आशा सांगळे उपस्थित होते. या कार्यक्रमास सुरेश झांटये परिवाराने सहकार्य केले. शेवटी आभार अक्षता दिपाजी हिने मानले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









