धारबांदोडा : सावर्डे मतदारसंघातील सुमारे 15 लाडली लक्ष्मी योजनेतील लाभार्थ्यांना आमदार गणेश गावकर यांच्याहस्ते मंजूरीपत्रे वितरीत करण्यात आली. यावेळी त्याच्यासोबत व्यासपीठावर मोले पंचायतीचे सरपंच कपिल नाईक, कुळे शिगांव सरपंच गोविंद शिगांवकर, साकोर्डा सरपंच प्रिया खांडेपारकर, काले पंचायतीचे सरपंच व साकोर्डा उपसरपंच शिरिष देसाई उपस्थित होते. धारबांदोडा तालुका प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात हा सोहळा संपन्न झाला. सरकारी योजनांचा लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोचवावा यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रयत्नशील असून सावर्डे मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांचे विशेष लक्ष आहे. सरकार सर्वसामान्यासाठी काम करीत असून प्रत्येकाचे पाठबळ सरकारला लाभल्यास मतदारसंघाचा अधिक विकास साधण्यात मदत होईल. मतदार संघातील नागरिकांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी आपला प्रयत्न असून प्रशासकीय संकुलात आपले कार्यालय आहे. त्यामुळे कोणतीही अडचण व समस्या असल्यास आपल्याशी किंवा कार्यालयात संपर्क साधावा. महिला व बाल कल्याण विकास मंत्री विश्वजीत राणे यांचेही चांगले सहकार्य लाभत असून त्यांच्या प्रयत्नामुळे लाडली लक्ष्मी योजनेतील अर्ज मंजूर झाले आहेत असे आमदार गणेश गावकर यावेळी म्हणाले. शाबलो पर्येकर यांनी सुत्रसंचालन केले.
Previous Article‘पीओपी’च्या मूर्तींवर बंदीची कडक अंमलबजावणी व्हावी
Next Article केरळवासीयांनी गोव्याशी नाते जुळवून घेतले
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.