आ. निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती ; मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुखांचे सौजन्य
कुडाळ –
नवी मुंबई शिवसेना ( शिंदे गट) जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या सौजन्याने तुळसुली येथील लिंगेश्वर विद्यालयातील होतकरू 100 विद्यार्थ्यांना मोफत सायकल वितरण आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. आजचे विद्यार्थी आपल्या देशाचे भविष्य आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आपले योग्य ते सहकार्य निश्चित राहील, अशी ग्वाही आमदार श्री राणे यांनी दिली. तुळसली येथील लिंगेश्वर विद्यालयाच सायकल वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिद्द व आत्मविश्वास यशाच्या संस्कारक्षम शिक्षण दिले, तर हेच विद्यार्थी पुढे जाऊन कुठे ना कुठेतरी जिल्हा, महाराष्ट्र व देशाच्या हितासाठी भवितव घडविणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आमदार नीलेश राणे उपस्थित होते. त्याच्या हस्ते विद्यार्थी व पालकाकडे सायकल वितरण करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तुळसुली सरपंच मिलिंद नाईक, संस्थेचे जॉइंट सेक्रेटरी ए. पी. वारंग , स्कूल कमिटी चेअरमन के. के. वारंग, स्कूल कमिटी सदस्य मकरंद नाईक , प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील भाटीवडेकर तसेच जि. प.माजी अध्यक्ष संजय पडते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, युवा सेना कुडाळ तालुकाप्रमुख सागर वालावलकर, तुळसुली उपसरपंच जयराम वारंग व पोलीस पाटील संतोष वेंगुर्लेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. श्री राणे म्हणाले, यशाकडे वाटचाल करायची असेल तर जिद्द व प्रबळ आत्मविश्वास पाहिजे.विद्यार्थांना संस्कारक्षम शिक्षण दिले, तर हेच विद्यार्थी पुढे जाऊन या जिल्ह्याचे, देशाचे भवितव्य घडविणार आहेत, असे त्यांनी सांगून विद्यार्थांच्या शारिरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने किशोर पाटकर यांनी सायकल देऊन जे सौजन्य दाखविले.त्याबद्द्ल त्यांचे कौतुक केले. प्रशाला व संस्थेच्या वतीने श्री पाटकर आणि मान्यवरांचे आभार मानले.ग्रामस्थ,पालक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.









