नवी दिल्ली:
टाटा टीयागो ही इलेक्ट्रीक कार सप्टेंबर 2022 मध्ये सादर करण्यात आली होती. त्यानंतर फेब्रुवारीत यावर्षी या गाडीच्या वितरण प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून आजवर 10 हजार टीयागोचे वितरण करण्यात आले आहे. एमजी कंपनीच्या नव्या कॉमेट गाडीला ही गाडी टक्कर देणार आहे.

टीयागोची किंमत 8.69 लाख ते 11.99 लाख रुपयांच्या घरात असून ही गाडी सध्याच्या इतर इलेक्ट्रिक कार्सच्या तुलनेत पाहता सर्वात परवडणारी म्हटली जाते. 2 बॅटरी पॅकसोबत ही इलेक्ट्रिक कार बुकिंगकरिता सप्टेंबर 2022 मध्ये खुली करण्यात आली होती. त्याचवेळी जवळपास 24 तासात 10 हजार गाड्यांचे ग्राहकांनी बुकिंग केले होते. डिसेंबर 2022 पर्यंत 20 हजार लोकांनी गाडीची ऑर्डर नोंदवली होती. सध्याची ताजी आकडेवारी कंपनीने जाहिर केलेली नाही. या गाडीत 19.2 केडब्ल्यूएच व 24 केडब्ल्यूएच अशा 2 वेगवेगळ्या बॅटरी ऑप्शन दिलेल्या आहेत. सिंगल चार्जवर टीयागो 250 ते 315 कि. मी. अंतर कापते, असा कंपनीचा दावा आहे.









