दोडामार्ग – प्रतिनिधी
Dist. W. Teacher Sakharam Zhore passed away
▪️प्रामाणिक शिक्षक आणि धनगर समाज उन्नतीसाठी काम करणारे व्यक्तीमत्व हरपले.
सखाराम गंगाराम झोरे (वय ४४) रा. झरे – काजूळवाडी यांचे शनिवारी संध्याकाळी निधन झाले. ते जि. प. शाळा बोडदे येथे कार्यरत होते. शिक्षक भारती संघटनेचे ते तालुका सचिव तर धनगर समाज संघटनेमध्येही मुख्य कार्यकारणीत होते. एक प्रामाणिक शिक्षक आणि धनगर समाज उन्नतीसाठी झटणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुलगे, भाऊ असा मोठा परिवार आहे. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचे शनिवारी निधन झाले.रविवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी तालुक्यातील शिक्षक, विविध शिक्षक संघटना प्रतिनिधी ,सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, धनगर समाज संघटना कार्यकर्ते,पदाधिकारी यांनी त्यांचे झरे – काजूळवाडी येथे अंत्यदर्शन घेतले.









