सावंतवाडी / प्रतिनिधी
Dist. Success of the students of W. Purna Primary School Sawantwadi No. 4 in various competitive exams!
ISO मानांकित, जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर 4 च्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धा परीक्षेतविद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळविले.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत कु.वेदा प्रविण राऊळ ही तब्बल 280 गुण मिळवून जिल्ह्यात चौथी तर तालुक्यात प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.कु.आराध्य रणजित माने याने 222 गुण मिळवून कास्य पदकाचा बहुमान ठरला.
STS परिक्षेतकु.वेदा प्रविण राऊळ ही गोल्ड मेडल मिळवून जिल्ह्यात तिसरी तर तालुक्यात प्रथम, कु.अमेय आनंद आपटे यांने गोल्ड मेडल मिळवून जिल्ह्यात 44 वा आला*.मिताली संदीप चव्हाण.( गोल्ड मेडल ),सिया अभिजित शेटकर (सिल्व्हर मेडल), आराध्या विजय गावडे (ब्राँझ पदक) ,अजय शैलेश मयेकर ( सिल्व्हर मेडल), आराध्य रणजित माने ( सिल्व्हर मेडल), श्रीशा सचिन राऊळ (ब्राँझ मेडल) मिळवावेत.
तर BDS परिक्षेत वेदा प्रविण राऊळ (गोल्ड मेडल),सन्मतिश अमर पाटील (ब्राँझ मेडल), स्वानंदी बाबासाहेब पाटील (ब्राँझ मेडल)तर अमेय आनंद आपटे यांनी गोल्ड मेडल पटकावलं.यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षक श्री केशव जाधव, श्रीमती लक्ष्मी धारगळकर, श्रीमती कविता धुरी, श्रीमती प्रणिती सावंत, श्री अमर पाटील, श्रीमती सुजाता पवार व त्यांच्या पालकांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे सावंतवाडीच्या गटशिक्षणाधिकारी सन्माननीय बोडके मॅडम, केंद्र प्रमुख श्रीमती लंगवे मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संतोष तळवणेकर , मुख्याध्यापक व पालकांनी अभिनंदन केले.









