सणासुदीत पाणीटंचाई : हिंडलगा पंपिंग स्टेशनमध्ये नादुरुस्ती
बेळगाव : हिंडलगा पंपिंग स्टेशनमध्ये दुरुस्तीच्या कारणास्तव शहरातील काही भागात सोमवार, मंगळवारी पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार आहे. शहराच्या दक्षिण भागातील मजगाव, नानावाडी, चिदंबरनगर, शहापूर, वडगाव, जुने बेळगाव, हिंदवाडी, आर. सी. नगर पहिले-दुसरे स्टेज, राजारामनगर, मांगिरीष कॉलनी, महावीरनगर, मँगो मिडोज, कलमेश्वर सोसायटी, अनगोळ, टिळकवाडी, शास्त्राrनगर, समर्थनगर, कपिलेश्वर कॉलनी, महात्मा फुले रोड तर उत्तर भागातील सह्याद्रीनगर, कुवेंपूनगर, टी. व्ही. सेंटर, सदाशिवनगर, बसव कॉलनी, कलमेश्वरनगर, अशोकनगर, माळमारुती एक्स्टेंशन, न्यू गांधीनगर, शिवाजीनगर, वीरभद्रनगर, सुभाषनगर, कॅन्टोन्मेंट, हिंडाल्को इंडस्ट्रीयल एरिया, डिफेन्स एरिया, सैनिकनगर, केएलई हॉस्पिटल, बिम्स हॉस्पिटल आदी भागात पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन एलअँडटी कंपनीने केले आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत शहरातील पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार असून शहरवासियांच्या अडचणीत वाढ होणार आहे. शिवाय दसऱ्या दिवशीच पाणी मिळणार नसल्याने नाराजीचे वातावरण असणार आहे.









