कुंदरगी-तुम्मरगुद्दी मार्गावर वीजटॉवर उभारणीचे काम
बेळगाव : हिडकल जलाशयातून बेळगावला पाणीपुरवठा होणाऱ्या कुंदरगी ते तुम्मरगुद्दी या भागात वीजपुरवठा करणारे टॉवर बसविले जाणार आहेत. यासाठी वीजपुरवठा खंडित केला जाणार असून त्याचा परिणाम शहरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर होणार आहे. यामुळे सोमवार दि. 12 व मंगळवार दि. 13 रोजी शहराच्या काही भागात पाणीपुरवठ्यामध्ये व्यत्यय येणार आहे. शहराच्या दक्षिण भागातील ब्रह्मनगर, मजगाव, भारतनगर, कपिलेश्वर कॉलनी, राणी चन्नम्मानगर, नाझर कॅम्प, समृद्धी कॉलनी, येळ्ळूर रोड, रानडे कॉलनी, हिंदवाडी, नानावाडी, चिदंबरनगर, शहापूर, वडगाव, जुनेबेळगाव, शहराच्या उत्तर भागातील सह्याद्रीनगर, कुवेंपूनगर, टी. व्ही. सेंटर, सदाशिवनगर, बसव कॉलनी, कलमेश्वरनगर, सुभाषनगर, अशोकनगर, न्यू गांधीनगर, कणबर्गी, कुडची, वीरभद्रनगर, अलारवाड, कॅन्टोन्मेंट, सैनिकनगर या परिसरात पाणीपुरवठ्यामध्ये व्यत्यय येणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.









