सरकारने पैसे कमी दिले की कोणी हडप केले? वसूली होत नाही, तोपर्यंत भूकंड विक्री करु नये
वार्ताहर/लाटंबार्से
लाटंबार्से गाव येथील सर्व्हे क्रमांक 625/1 या जागेतील एक लाख 91 हजार 125 चौरस मीटर जागेमध्ये लाटंबार्से कोमुनिदाद हे मालक असून त्यामध्ये कुळाचे नावही समाविष्ट आहे. सरकारने सदर जागा नियोजित लाटंबार्से औद्योगिक वसाहतीसाठी संपादन केली असून एकूण जागेमधील अर्धा हिस्सा कूळ तर अर्धा हिस्सा लाटंबार्से कोमुनिदाद यांच्याकडे असल्याने यांना सदर जागेचे पैसे दिले. परंतु सदर जागेतील फक्त 45 लाख रु. लाटंबार्से कोमुनिदादला मिळाले असे कोमुनिदादचे कारकून यांनी गावकऱ्यांच्या प्रŽांना माहिती दिल्याने सभेत संताप व्यक्त झला.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जागेच्या भावाप्रमाणे हिशोब केला असता कोमुनिदादला कोटीच्या घरात पैसे येणे जऊरीचे होते. उरलेले पैसे गेले कोठे? गावकऱ्यांना विश्वासात न घेता तुम्ही उरलेले पैसे हडप केले की काय असा प्रŽ गावकऱ्यांनी केला आहे. झालेल्या गैरव्यवहाराचा तपास करावा व योग्य ती तपासणी करून एकूण झालेल्या पैशाचा गैरव्यवहार तसेच झालेल्या अफरातफरची व्यवस्थापकीय कोमुनिदाद, दक्षता खाते तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार दाखल करावी. तसेच उर्वरित थकीत वसुलीचा योग्य तो तपास होत नाही तोपर्यंत सदर जागेमधील एकही भूखंडाची विक्री करू नये असा ठराव लाटंबार्से कोमुनिदादच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत गावकऱ्यांनी घेवून तो ठराव सर्वानुमते मंजूर करून घेतला.
सदर सभा कासरपाल येथील श्री सातेरी भूमिका मंदिराच्या प्रांगणात घेण्यात आली. यावेळी लाटंबार्से परिसरातील मोठ्या संख्येने गावकर मंडळी उपस्थित होते. सदर सभेत कोमुनिदादचे वकील विवेक दांडेकर यांनी विविध कोर्टात चालू असलेल्या खटल्यातील आपले बिल कोमुनिदादकडे सादर केले होते. जवळजवळ दोन लाखांचे बिल त्यांचे देणे असून तो विषय सभेत गावकऱ्यांसमोर ठेवला असता त्यावर चर्चा करून वकील विवेक दांडेकर यांना बिल देण्याचे ठरविण्यात आले.









