प्रतिनिधी/ बेळगाव
समर्थनगर येथे दि. 20 मे 2023 रोजी सोने-चांदीच्या दागिन्यांची चोरी झाली होती. यासंबंधी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद नोंदविण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.
एसीपी एन. व्ही. बरमणी यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यासीन हाशीम शेख (वय 23) रा. निपाणी, जि. बेळगाव याला अटक करून त्याच्याजवळून अंदाजे 10 लाख रुपये किमतीचे 231 ग्रॅम सोने, 140 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले.
मार्केट पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक धामण्णावर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर, महांतेश मठपती, कॉन्स्टेबल शरदकुमार खानापुरे, विश्वनाथ माळगी, शंकर कुगटोळ्ळी, खादरसाब खान्नमण्णावर, लक्ष्मण कडोलकर, अशीर जमादार, शिवानंद चेंडकी, विनोद जगदाळे, शिवप्पा तेली, संजू पात्रोट यांनी या तपासकार्यात भाग घेतला. पोलिसांच्या या कारवाईबद्दल पोलीस आयुक्तांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.









