चालू आठवड्यात दिल्लीत पोहोचणार फ्रेंच शिष्टमंडळ : नौदलासाठी राफेल विमानांची होणार खरेदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि फ्रान्स यांच्यात पुन्हा एकदा राफेलच्या खरेदीसाठी बैठक होणार आहे. 30 मे रोजी उच्चस्तरीय फ्रेंच शिष्टमंडळ भारतात पोहोचणार असून त्यानंतर दोन्ही देशांचे अधिकारी करारविषयक चर्चा सुरू करतील. 26 राफेल नेव्हल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी ही चर्चा होणार असून यासाठीचा व्यवहार 50 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा राहू शकतो.
फ्रेंच शिष्टमंडळ लढाऊ विमानाच्या व्यवहारावर अधिकृत चर्चा करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. फ्रेंच शिष्टमंडळात डसॉल्ट एव्हिएशन आणि थेल्स या कंपनीसोबत फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालय आणि उद्योग मंत्रालयाचे अधिकारी सामील असतील. तर भारतीय शिष्टमंडळात संरक्षण अधिग्रहण विभाग आणि भारतीय नौदलाचे अधिकारी सामील असणार आहेत.
चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत फ्रान्ससोबतची चर्चा पूर्ण करणे आणि करारावर स्वाक्षरी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. फ्रान्सने भारतीय नौदलाच्या विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्यसाठी 26 राफेल नेव्हल जेट खरेदीसाठी भारताच्या निविदेवर डिसेंबर महिन्यातच प्रतिक्रिया दिली होती. फ्रान्सने भारताकडून जारी निविदेनुसार डिसेंबरमध्येच अर्ज केला होता. प्रकल्पासाठी आवश्यक कालमर्यादेत घट केली जावी, जेणेकरून विमानांना लवकर अंतिम स्वरुप दिले जावे, असा निर्देश नौदल प्रमुखांनी स्वत:च्या टीमला दिला आहे.
या लढाऊ विमानांच्या ताफ्यातील समावेशामुळे भारतीय विमानवाहू युद्धनौकांवर तैनात मिग-29के लढाऊ विमानांवरील दबाव कमी होणार आहे. भारत या कराराद्वारे फ्रान्सकडून 22 सिंगल सीटर लढाऊ विमाने तर 4 डबल सीटर लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. डबल सीटर लढाऊ विमाने प्रशिक्षणासाठी उपयुक्त ठरणार आहेत.
राफेल विमानाची वैशिष्ट्यो
राफेल एक अत्यंत उपयुक्त लढाऊ विमान आहे. या विमानाची लांबी 15.27 मीटर असून यात एक किंवा दोन वैमानिक सामावू शकतात. हे विमान उंच भागांमध्ये लढाऊ कौशल्य दाखवून देण्यास सक्षम आहे. राफेल विमान एका मिनिटात 60 हजार फुटांच्या उंचीपर्यंत पोहोचू शकते. तसेच कमाल 24,500 किलोग्रॅम वजनाच्या शस्त्रास्त्रांसह उ•ाण करण्याची याच्यात क्षमता आहे. याचा कमाल वेग 2200 ते 2500 किलोमीटर प्रतितास इतका आहे. तर याची उ•ाणक्षमता 3700 किलोमीटर आहे. ऑप्ट्रॉनिक सिक्योर फ्रंटल इंफ्रारेड सर्च आणि ट्रॅक सिस्टीमने युक्त विमानात एमबीडीए, एमआयसीए, एमबीडीए मेटेओर आणि एमबीडीए अपाचे यासारखी अनेक क्षेपणास्त्रs जोडण्यात आलेली आहेत. या क्षेपणास्त्रांद्वारे क्षणार्धात शत्रूचा खात्मा करता येतो.