लाटंबार्से : साळ ग्रामपंचायतीची सर्वसाधारण ग्रामसभा विविध विषयांवर चर्चा करत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी सामुदायिक आरोग्य केंद्र डिचोलीतील व साळ उप आरोग्य केंद्राचे संलग्न डॉ. गौरेश नाईक यांनी पावसाळ्यात पसरणाऱ्या मलेरिया व डेंगू या रोगाची लक्षणे, उपाय याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच अधिकारी सुलोचनी चंद्रोजी यांनी क्षयरोग विषयी तसेच महत्त्वपूर्ण असलेल्या अवयव दानाची माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली.
सुऊवातीला सरपंच घाडी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ग्रामसभेत पंचायत सचिव पुंडलिक गवस यांनी मागील सभेचा अहवाल वाचन केले. गटार योजना पूर्णपणे कोलमडली असून पावसावेळी गुडघाभर पाण्यातून घरात प्रवेश करावा लागतो व पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे रस्त्यावरून पादचाऱ्यांना चालणे कठीण होते. त्यामुळे आगामी काळात अभियंताद्वारा नियोजन करून योग्य निचरा होण्यासाठी चेंबरचे बांधकाम करावे. तसेच मळा शेती क्षेत्रात रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुरक्षा कवच बांधकाम करावे. मधला वाडा बस स्थानकावर बसवलेली सुरक्षा तटबंदी तशीच ठेवावी, गावातील लोकसंख्या व घरांची संख्या वाढल्याने आणखी एका प्लंबरची खात्याकडून नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली. येथील मतदारांची पडताळणी करण्याबाबत, तसेच राष्ट्रीय हमी योजनेअंतर्गत बांधकामाविषयी, कचरा कर आकारणीवर, दामोदर परब व विनायक ठाकूर यांच्या घरापर्यंत पक्क्या रस्त्याचे बांधकाम करणे याविषयी, प्रभाग नंबर 5 मध्ये गटार साफसफाई अर्धवट का केली यावर चर्चा केली. जैवविविधता कामकाजाबद्दल निष्क्रियता आढळून आल्याने अंतिम नोटीसी नंतर नव्याने क्रियाशील अशी कमिटी निवडावी असे ठरले. पंचायतीतर्फे पंचायत क्षेत्रात आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही पॅमेरे बसवले जातील असे सांगितले.
साळ खोलपेवाडी व पुनर्वसन मध्ये भाडेकरूंची घरमालक माहिती देत नसल्यास घर मालकाला पंचायतीकडून दंड आकारण्यात यावा. तसेच मधलावाडा पुलाकडून सुरक्षा भिंत बांधून लगतच्या स्मशानभूमीपर्यंत रस्त्याचे बांधकाम करावे. सतत भेडसावणारी वीज समस्येबद्दल, तसेच गावातील मोकाट गुरांचा योग्य बंदोबस्त करण्याविषयी चर्चा करण्यात आली. मुख्य रस्ता ते उमादेवी राऊत यांच्या घरापर्यंतच्या फुटपाथची पुनरबांधणी करावी, अशी मागणी करण्यात आली. या ग्रामसभेत यशवंत राऊत, सुरेश राऊत, मेघश्याम राऊत, प्रकाश परब, मुकुंद राऊत, दीपक राऊत, फटी राऊत, गणेश राऊत, लक्ष्मण नाईक, देविदास राऊत, बाबी राऊत, कीर्ती राऊत, प्रिया राऊत, श्रावणी राऊत, दामिनी परब यांनी चर्चेत भाग घेतला तर ग्रामस्थांकडून उपस्थित झालेल्या प्रŽांचे सरपंच सावित्री घाडी, उपसरपंच देऊ राऊत, पंच विशाल परब, पंच निता राऊत, पंच वैष्णवी, पंच मनोहर शिंदे यांनी योग्य निरसन करून पुढील कारवाई करू असे सांगितले. पंच दिव्या नाईक अनुपस्थित राहिल्याने ग्रामस्थानी तीव्र नापसंतीत प्रŽ उपस्थित करून लागोपाठ तीन ग्रामसभांना गैरहजर राहिल्यास निलंबनाची कारवाई करण्यात यावी असे ठरले. ग्रामसभेचे व्यवस्थापन शांबा घुरे, सर्वेश चांदेलकर व आनंद राऊत यांनी केले. पंच नीता राऊत यांनी आभार मानले.









