कॅनडाच्या माजी पंतप्रधानांसोबत रिलेशनशिपमध्ये
अमेरिकन गायिका केटरी पेरी ही कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यासोबत कॅनडाच्या मॉन्ट्रियल शहरात डिनर करताना दिसून आली आहे. केटी आणि ट्रुडो यांची ही भेट ले वायलोन रेस्टॉरंटमध्ये झाली आहे. दोघांच्या या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अलिकडेच केटीचे प्रियकर ऑरलँडो ब्लूमसोबतचे मागील 9 वर्षांपासूनचे नाते संपुष्टात आले आहे. दुसरीकडे ट्रुडो देखी स्वत:च्या पत्नीपासून दोन वर्षापासून वेगळे राहत आहेत. यामुळे आता या डिनर डेटची चर्चा रंगू लागली आहे. केटी आणि ट्रुडो यांची ही भेट सामान्य सेलिब्रिटींप्रमाणे नव्हते. कारण यादरम्यान त्यांचे अनेक सुरक्षारक्षक नजर ठेवताना दिसून आले. तेथे तेनात सुरक्षारक्षक पूर्ण संध्याकाळ परिसरात देखरेख ठेवून होते. केटी ही ऑरलँडोपासून वेगळी झाल्यापासून सिंगल आहे. परंतु ऑरलँडोपासून तिला एक मुलगी आहे. तर जस्टिन ट्रुडो यांनी 18 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर ऑगस्ट 2023 मध्ये सोफी ग्रेगोइरेपासून वेगळे होत असल्याची घोषणा केली होती. या विवाहापासून ट्रुडो यांना तीन अपत्यं आहेत.









