युक्रेनचा ठाम पवित्रा ः सीमेवरील ताबा सोडण्याचा रशियाला इशारा
मॉस्को, कीव्ह / वृत्तसंस्था
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध गेल्या दहा महिन्यांपासून अखंडपणे सुरू असतानाच युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी रशिया चर्चेसाठी तयार असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केला आहे. रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत असताना हे वक्तव्य आले आहे. गेल्या आठवडाभरात दोनवेळा रशियाने यासंबंधी वक्तव्य केल्याने नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. मात्र, युक्रेन किंवा त्यांच्या मित्रराष्ट्रांना अद्यापही रशियावर विश्वास नसल्याने या वक्तव्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. युक्रेन सध्या चर्चेला तयार नसल्याचे दिसत आहे. रशियाने आधी हल्ले थांबवावे आणि आपल्या सीमेवरील ताबा सोडावा तरच चर्चा शक्य होईल, असे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या 10 महिन्यांपासून रशिया आणि युपेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाने युपेन जवळजवळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. युपेनमधील अनेक शहरे भग्नावस्थेत बदलली आहेत. रशिया युपेनला पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असले तरी युपेनच्या सैनिकांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. नाटो देश युपेनला शस्त्रास्त्रांसह आर्थिक मदत करत असल्यामुळे या युद्धात ते रशियाला तोडीस तोड उत्तर देत आहेत.
हल्ले सुरूच
रशिया आणि युपेनमधील युद्ध तूर्त तरी संपेल असे वाटत नाही. रशियाने रविवारी खार्किव प्रदेशातील कुपियान्स्क जिह्यावर 10 हून अधिक रॉकेट हल्ले केले, कुपियान्स्क-ल्यामान प्रंटलाईनच्या बाजूने 25 हून अधिक शहरांवर गोळीबार केला आणि झापोरिझियामधील सुमारे 20 शहरांना लक्ष्य केल्याचे युपेनच्या सर्वोच्च लष्करी कमांडने सांगितले.
युक्रेनचे ड्रोन रशियाने केले नष्ट, 3 ठार
आपल्या एअरबेसकडे येत असलेले युपेनचे ड्रोन रशियाने नुकतेच पाडले. रशियन लष्कराने सोमवारी याबाबत माहिती दिली. या महिन्यात दुसऱयांदा युपेनने रशियन एअरबेसला लक्ष्य केल्याचे सांगितले जात आहे. ही घटना एंगेल्स एअरबेसवर सोमवारी सकाळी घडली असून यात तीन सैनिकांचा मृत्यू झाला.









