‘नरक’ हे असे स्थान असते की जे हवे असलेला माणूस शोधूनही सापडणे अशक्य आहे. नरक कसा असतो याची भयावह वर्णने काही धर्मग्रंथांमध्ये किंवा प्रचलित समजुतींमधून आपल्याला माहिती असतात. पापकर्म केल्यास मृत्यूनंतर नरक प्राप्ती होते, असे सांगतिले गेले आहे. स्वर्ग-नरकारवर विश्वास ठेवणारे अनेक जण असतात. शास्त्रज्ञांच्या दृष्टीने ही केवळ एक कल्पना आहे.
पण दोन दशकांपूर्वी अवकाश शास्त्रज्ञांना एका अशा ग्रहाचा शोध लागला आहे, की तेथील परिस्थिती पाहून त्यांनी त्याचे नाव नरक ग्रह असे ठेवले आहे. या ग्रहावरुन पृथ्वीवर अत्यंत अजब असे ध्वनितरंग संदेश येत आहेत. या ग्रहाचे जे दर्शन दुर्बिणीतून ज्या प्रकारचे होत आहे, की तो साक्षत नकरच वाटावा. नरकात माणसाला आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या स्थितीत यातना भोगत रहावे लागते, असे म्हणतात. हा ग्रहही असाच ज्वाळांनी वेढलेला आणि धुमसता वाटावा असा आहे.
संशोधक या ग्रहाचे रहस्य शोधण्यात मग्न आहेत. त्यावर एक अभ्यास अहवालही प्रसिद्ध झालेला आहे. या ग्रहावर असंख्य जागृत ज्वालामुळे आहेत, जे नेहमी फुटत असतात. त्यामुळे दुरुन पाहताना या ग्रहावर अग्नीचे साम्राज्य पसरलेले दिसून येते. हा ग्रह त्याच्या मूळ ताऱ्याच्या इतका जवळ आहे की सहसा इतक्या नजीक ग्रह नसतात. त्यामुळेच त्याला नरकग्रह असे संबोधण्यात येत आहे.