काहेरच्या डॉ. श्रीधर घगाणे यांनी घेतले अमेरिकेत प्रशिक्षण
बेळगाव : कॅन्सर ओळखण्याच्या कार्यात महत्त्वाचा टप्पा गाठण्यात काहेरच्या डॉ. प्रभाकर कोरे बेसिक सायन्स रिसर्च केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. श्रीधर घगाणे यशस्वी झाले आहेत. डॉ. घगाणे यांनी फिलाडेल्फिया (अमेरिका) येथील थॉमस जेफरसन विद्यापीठामध्ये 2 महिन्यांचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. थॉमस जेफरसन विद्यापीठाचे डॉ. मॅथ्यूएल ठाकूर व डॉ. केव्हीन केल्ली यांच्या प्रयोगशाळेत प्रशिक्षण घेतलेल्या डॉ. घगाणे यांनी कॉन्फोकॉल फ्युरोसिन्स मायक्रोस्कॉपी प्रशिक्षणामध्ये टीपी 4303 सुक्ष्माणू वापरून प्रोस्टेट कॅन्सरचा शोध लावण्याची सरळ पद्धत दाखवून दिली आहे. ही पद्धत भविष्यात कॅन्सर ओळखण्यास उपयोगी ठरणार आहे. डॉ. घगाणे यांचे केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, काहेरचे उपकुलगुरु डॉ. नितीन गंगाणे, कुलसचिव डॉ. एम. एस. गणाचारी यांनी अभिनंदन केले आहे.
भारतीय लोकसंख्येनुसार दिसून येणारा कॅन्सनरच्या गाठीतील डीएनए ओळखण्यास सविस्तर माहिती दिली आहे. या अत्याधुनिक पद्धती प्रोस्टेट, अंडाशय व एंडोमेट्रियल कॅन्सर ओळखण्यास उपयोगी ठरणार आहे. जुन्या पद्धतीशी तुलना केल्यास कॅन्सर ओळखण्याची ही नवीन पद्धत अत्यंत परिणामकारी, रुग्णस्नेही तसेच माफक दरात उपलब्ध होणार आहे. हे संशोधन कॅन्सर ओळखण्यास उपयोगी ठरणार आहे. माफक दरामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात कॅन्सर ओळखण्यास येणार असल्याने भारतीयांना या पद्धतीचा फारच उपयोग होणार आहे. ही नवी पद्धत अत्याधुनिक संशोधन व कॅन्सर ओळखण्याच्या जागतिक शैक्षणिक कार्याला बळ देणारी आहे. याशिवाय स्थानिकांचे आरोग्य रक्षणासाठी प्रमुख भूमिका बजावणार असल्याचे डॉ. घगाणे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या कार्याला थॉमस जेफरसन विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. रिचर्ड डर्मन, डॉ. लिओनार्ड गोमेल्ला, डॉ. मॅथ्यूएल ठाकूर व पार्थ ललाकिया तर काहेरकडून डॉ. एस. एस. गौडर, डॉ. आर. बी. नेर्ल्ली, डॉ. रमेश परांजपे यांचे सहकार्य मिळाले आहे.









