वृत्तसंस्था/ डल्लास
येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील डल्लास खुल्या पुरुषांच्य टेनिस स्पर्धेत अमेरिकेचा ओपेल्का आणि ब्रिटनचा कॅमेरुन नुरी यांच्यातील झालेल्या सामन्यावेळी पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याबद्दल ओपेल्काने या निर्णयाविरुद्ध पंचांबरोबर हुज्जत घालताना काही अपशब्द वापरल्याने त्याच्यावर आता शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या सामन्यात ओपेल्काने कॅमेरुन नुरीचा 4-6, 7-6 (7-5), 6-4 अशा सेटसमध्ये पराभव करत पुढील फेरी गाठली. या सामन्यानंतर एटीपीच्या नियमानुसार ओपेल्कावर शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले









