सैनिक टाकळी, प्रतिनिधी
Rajapur Bandhara News : राजापूर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग बंद झाल्यामुळे खिद्रापूर,राजापूर वाडी, सैनिक टाकळी आणि जुने दानवाड या गावांना शेतीच्या पाण्यासह पिण्याची पाण्याची टंचाई भासत आहे.
पावसाळ्याचा हंगाम सुरू होऊनही अद्याप पाऊस पडलेला नाही. गेल्या काही वर्षापर्यंत राजापूर बांधाऱ्याला गळती होती त्या गळतीच्या पाण्यावर या सदर चार गावांना पाणीपुरवठा होत होता परंतु, गेल्यावर्षी या बांधाऱ्याची पूर्णता गळती काढण्यात आली, बर्गे टाकून दरवाजे बंद करण्यात आले परिणामी या बांधाऱ्यातून पाणी विसर्ग थांबला आहे.
या बांधाऱ्याच्या खालील बाजूस नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यातच विजेच्या लपंडावामुळे दोन दोन तास विद्युत पंप बंद राहतात. याउलट कर्नाटकातील शेतकऱ्यांची नदी काठावरील विद्युत पंप रात्रंदिवस सुरू आहेत याचा परिणाम महाराष्ट्रातील या चार गावांना वर्षाला उन्हाळ्याचा फटका बसतो.आणि आता या भागातील शेतकऱ्यांची ऊस पिके सुकू लागले आहेत. शेतातील भाजीपाला उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. असेच काही आणखीन दिवस राहिले तर या भागातील शेतकऱ्यांना शेतीसह पिण्याचे पाणी पूर्णतः बंद होण्याची शक्यता आहे.

यासाठी या चार गावातील नागरिकांनी कृती समिती बैठक घेऊन लवकरच पाटबंधारे विभागाला आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना किमान दानवाडपर्यंत पाणी सोडण्याचे निवेदन देण्यात यावे अशी या भागातील लोकांची मागणी होत आहे.









