: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून आढावा सुरू
कोल्हापूर प्रतिनिधी
जिह्यात पावसाने सकाळपासून अक्षरश: कोसळधार सुऊ केली आहे. यामुळे ठिकठिकाणी बंधारे पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी पर्यटक, प्रवासी अडकण्याच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरावील ‘अलर्ट मोड’ वर आले आहेत. नागरिकांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी तालुकास्तरावरील आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचार्यांचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. या तालुकास्तरीय नियंत्रण कक्षांशी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संपर्क साधून आढावा घेतला जात आहे.
सध्या सुऊ असलेल्या मुसळधार पावसामुळे आपत्तीत सापडलेल्या नागरिकांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी चोवीस तास सुऊ असलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षासह तालुकास्तरावरील नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी व संबंधित कर्मचार्यांचे मोबाईल क्रमांक जारी केले आहेत. त्यामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय (0231-2659232, 2652950,2652953,2652954), करवीर तालुका-गुऊप्रसाद जाधव (0231-2644354, मो-9970602222), गगनबावड-नीळकंठ पाटील (02326-222038, मो-9423231929), पन्हाळा-शशिकांत सातपुते (02328-235026, मो-7588228806), कागल- भारती चौगले (02325-244023, मो-9503478291), राधानगरी-संग्राम शिंदे (02321-234023, मो-9445145853), भुदरगड- आण्णासो तिकोडे (02324-220029, मो-9049006658), आजरा-धनाजी चव्हाण (02323-246131, मो-9823176873), गडहिंग्लज- चंद्रकांत पालकर (02327-222252, मो-9096462984), शिरोळ-संदीपान हंगे (02322-236447, मो-9146593773), हातकणंगले- निलेश संकपाळ (0230-2483128, मो-7972820758), शाहुवाडी-राजकुमार नांदुरे (0239-224110, मो-9158202681), चंदगड- शामराव तरवाळ (02320-224128, मो-9657074149), इचलकरंजी- पुजा दासरी (0230-2483128, मो-8459512852).









