वृत्तसंस्था/ लर्नाका (सायप्रस)
आयएसएसएफतर्फे येथे झालेल्या विश्वचषक शॉटगन पुरुष आणि महिलांच्या ट्रॅप नेमबाजीत भारतीय नेमबाजांकडून निराशा झाली आहे. या स्पर्धेत भारत अद्याप पहिले पदक मिळवण्यासाठी धडपडत आहे.
महिलांच्या ट्रॅप नेमबाजीत भारताची सबिरा हॅरीस हिला 18 व्या स्थानावर तर पुरुषांच्या ट्रॅप नेमबाजीत लक्ष्य सेरॉनला 45 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. ब्रिटनच्या लुसी हॉलने महिलांच्या ट्रॅप नेमबाजीतील सुवर्णपदक तर पुरुषांच्या ट्रॅप नेमबाजीतील सुवर्णपदक क्रोएशियाच्या अँटोन ग्लेसनोव्हिकने पटकावले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताचे नेमबाज मनीषा कीर, शगून चौधरी, किरण आणि कीर्ती गुप्ता, बी. मलिक, यांची कामगिरी असमाधानकारक झाली.









