वृत्तसंस्था/ जिनजू (कोरिया)
येथे सुरु असलेल्या आशियाई पुरुष आणि महिलांच्या वेटलिफ्टींग स्पर्धेत भारताची अव्वल महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूकडून साफ निराशा झाली.
शुक्रवारी मीराबाई चानूने आपल्या वजन गटात स्नॅचमध्ये 85 किलो तर क्लिन आणि जर्कमध्ये 109 किलो असे एकूण 194 किलो वजन उचलत पाचवे स्थान मिळविले. चानूने यापूर्वी 207 किलो ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली होती. मात्र कारियातील या स्पर्धेत तिची निराशा झाली.









