वृत्तसंस्था/ बुडापेस्ट
येथे सुरू असलेल्या विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रम नोंदवणारा अॅथलिट जेस्वीन अल्ड्रीनला पुरुषांच्या लांब उडीत दर्जेदार कामगिरी करता आली नाही. या क्रीडा प्रकारातील अंतिम टप्प्यात अल्ड्रीनने 7.77 मी. ची नोंद केल्याने त्याला 11 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. गेल्या मार्चमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अल्ड्रीनने 8.42 मी. चा राष्ट्रीय विक्रम केला होता.
पुरुषांच्या 35 कि. मी. चालण्याच्या शर्यतीत भारताच्या राम बाबूला 27 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याला ही शर्यत पूर्ण करण्यासाठी 2 तास 39 मिनिटे आणि 0.7 सेकंदाचा अवधी लागला.









