सायकल चालवा पर्यावरण वाचवाचा संदेश देत मोहिमेत सहभाग
प्रतिनिधी/ सातारा
ध्येय, जिद्द आणि चिकाटी असेल तर ठरवलेले उद्दीष्ठ माणूस गाठू शकतो. असेच एका ध्येयाने प्रेरीत होवून कार्य करणारे आर्यनमॅन शशिकांत कुंभार यांनी दिव्यांग असूनही सायकलवऊन कराड ते कन्याकुमारी असा प्रवास कऊन नवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. शशिकांत कुंभार यांनी सायकल चालवा पर्यावरण वाचवा हा संदेश देत तब्बल 1350 किलोमीटरचे अंतर पार कऊन रेकॉर्ड केले आहे. त्यांच्या या विक्रमाबाबत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कराड ते कन्याकुमारी सायकलदेशा रॅली काढण्याचे नियोजन ठरले. त्यात आयर्नमॅन शा†शकांत कुंभार यांनी सहभागी होण्याचा निश्चय केला. त्यांनी देश रक्षण करताना स्वत:चा पाय गमावला आहे. तरीही ते खचून न जाता पुन्हा त्याच प्रेरणेने त्याच उमेदीने ते नवनवे विक्रम करत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा कराड ते कन्याकुमारी 1350 ा†कमीचा पला सायकलवऊन गाठला आहे.
आपला पाय जरी गमावला असला तरी ते सायकल चालवून सगळ्यांसमोर त्यांनी एक नवा आदर्श ा†नर्माण केला आहे. सायकल चालवा, पर्यावरण वाचवा यासाठी ते आा†ण त्यांचे पाच साथीदार प्रयत्नशील असतील. या त्यांच्या सायकलदेशा रॅलीचे कौतुक होत आहे. या मोहिमेत शा†शकांत कुंभार ( वय 55), माधव माने (वय 63)&, अऊण शिंदे (वय 47), सुनील पाटील (वय 52), अरविंद माने(वय 56) यांनी सहभाग घेतला आहे.








