राजन पोकळे; दीपक केसरकर मित्र मंडळातर्फे दिव्यांग समता सप्ताह संपन्न
सावंतवाडी | प्रतिनिधी
दिव्यांग मुलांमध्ये विशेष अशी क्षमता आहे आणि त्यांची क्षमता आणि त्यांच्या अंगी असलेले गुण अधिक दृढ करण्यासाठी पूरक असे काम करणे आवश्यक आहे. या दिव्यांग मुलांमध्ये आत्मनिर्भरपणा जागवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आता वाढली आहे. आणि या जबाबदारी नुसारच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग मुलांसाठी व त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी नवोउपक्रम दीपक केसरकर मित्र मंडळाच्या वतीने राबविण्यात येतील त्यासाठी निश्चितपणे तसा आराखडा बनवण्यात येईल असे माजी उपनगराध्यक्ष, दीपक केसरकर मित्रमंडळाचे अध्यक्ष राजन पोकळे यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात समग्र शिक्षा अभियानांतर्गत सावंतवाडी पंचायत समिती गटसाधना केंद्रातर्फे दिव्यांग समता सप्ताह ,बाल आनंद मेळावा व पालक उद्बबोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून श्री पोकळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा अँड निता सावंत कविटकर, शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, शिक्षणमंत्र्यांचे सचिव, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, संदीप पवार, गजानन नाटेकर, नंदू गावडे गजानन नाटेकर,सौ स्वप्ना नाटेकर, शिक्षण विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, म ल देसाई, नरेंद्र सावंत, राम गावडे खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष राजन रेडकर, सौ भारती मोरे, आर पी डी हायस्कूल मुख्याध्यापक जगदीश धोंड, गोपाळ गावडे, प्रमोद पावसकर, पुजा नाईक, लतिका सिंग, ज्योती मेस्त्री, सध्या मोरे, अनिता शिंदे, निलीमा चलवाडी,भारती परब, श्री सांगेलकर आधी उपस्थित होते सूत्रसंचालन वंदना सावंत तर, आभार रामचंद्र वालावलकर प्रास्ताविक गोपाळ गावडे यांनी केले.









