सांबरा : बेळगाव-सांबरा रस्त्यावरील दिशादर्शक फलक झाडाझुडपांच्या विळख्यात सापडले असून फलकाना वेलींनीही व्यापले आहे. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. सांबरा येथे असलेल्या विमानतळामुळे या रस्त्याला विशेष महत्त्व आहे. या रस्त्यावरून नेहमीच वाहनांची वर्दळ असते. मात्र या रस्त्याच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. ठिकठिकाणी रस्ता उखडून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. तर दिशादर्शक फलकही झाडाझुडपांच्या व वेलीच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे नवीन वाहनचालकांची गैरसोय होत आहे. या रस्त्यावरून नेहमीच राजकीय नेते, मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे येणे जाणे असते. मात्र तरीदेखील या रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मुतग्याजवळ तर रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली आहे. त्यामुळे दररोज वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.
Previous Articleप्रवाशांना जुन्या नादुरुस्त बसची डोकेदुखी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









