या कालावधीत कॉर्पोरेट कर संकलनाचा वेग मंद राहिला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
1 एप्रिल ते 10 फेब्रुवारी दरम्यान आर्थिक वर्ष 2025 मध्ये निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 14.7 टक्क्यांनी वाढून 17.8 लाख कोटी रुपये झाले. प्राप्तिकर विभागाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीवरून ही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये, बिगर-कॉर्पोरेट कर गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 20.9 टक्क्यांनी वाढून 9.4 लाख कोटी रुपये जमा झाला.
या कालावधीत, कॉर्पोरेट कर संकलनाचा वेग संथच राहिला आणि तो 6.1 टक्क्यांनी वाढून 7.8 लाख कोटी रुपये झाला. या कालावधीत, सकल प्रत्यक्ष कर संकलन 19.1 टक्क्यांनी वाढून 21.9 लाख कोटी रुपये झाले, तर परतफेड 42.6 टक्क्यांनी वाढून 4.1 लाख कोटी रुपये झाली.









