मध्यवर्ती बसस्थानकातून धावणार बसेस, प्रवाशांची गैरसोय दूर
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून हुबळी रेल्वे बसस्थानकात बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. वंदे भारत धारवाड ते बेंगळूर रेल्वे सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव ते थेट हुबळी रेल्वेस्थानकापर्यंत बससेवा सुरू आहे.
बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून दररोज सकाळी 11.15 वा. सुटणारी ही बस दुपारी 1.15 वा. हुबळी रेल्वेस्थानकावर पोहोचणार आहे. तर दुपारी 12.20 वा. हुबळी रेल्वेस्थानकातून सुटणारी बस दुपारी 2.20 वा. बेळगाव बसस्थानकात पोहोचणार आहे. पूर्वीच्या धावणाऱ्या रेल्वेच्या तुलनेत वंदे भारतला एक तास वेळ कमी लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी बेळगाव ते थेट हुबळी रेल्वेस्थानक अशी बससेवा सुरू केली आहे.









