माजी नगरसेविका दिपाली भालेकरांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन
सावंतवाडी –
सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या नव्या व्यापारी संकुलाला संत गाडगेबाबांचे नाव देण्यात यावे ,तसेच त्यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी काल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांकडे केलीय . ८० वर्षांहून जुनी असणारी संत गाडगेबाबा मंडई जमीनदोस्त करण्यात आली आहे . त्याजागी आता लवकरच नवीन व्यापारी संकुल उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे . त्यामुळे या व्यापारी संकुलाला संत गाडगेबाबांचे नाव देवून संकुलाच्या ठिकाणी संत गाडगेबाबांचा पूर्णकृती पुतळा उभारावा अशा मागणीचे निवेदन सादर केले . यावेळी शिंदे सेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा नीता सावंत कविटकर उपस्थित होत्या .









