ओटवणे / प्रतिनिधी
Dinesh Raul first in Sawantwadi taluka in intelligence examination
माडखोल केंद्र शाळा नं १ चा विद्यार्थी
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत माडखोल केंद्र शाळा नं १ मधील दिनेश कृष्णा राऊळ या विद्यार्थ्याने २२२ गुणासह सावंतवाडी तालुक्यात प्रथम तर जिल्हयात पाचवा क्रमांक पटकाविला. तसेच याच शाळेची गौरी अमोल राऊळ ही विद्यार्थिनीही या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे.इयत्ता सातवीत आसलेला दिनेश राऊळ या यापूर्वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतही जिल्हा गुणवत्ता यादीत चमकला होता. एसटीएस परीक्षेतही त्याने सहावी व सातवीत अनुक्रमे ब्राँझ व सिल्व्हर पथक पटकावले. या यशाबद्दल त्याचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
दिनेश राऊळ हा माडखोल उपसरपंच तथा माडखोल सोसायटीचे चेअरमन कृष्णा उर्फ जीजी राऊळ यांचा तो मुलगा आहे. त्याला माडखोल केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर, शाळेच्या मुख्याध्यापिका विशुदा आजगावकर, माजी मुख्याध्यापक अरूण म्हाडगुत, वर्गशिक्षिका रश्मी सावंत, शिक्षक दीपक पंडित, स्वप्नजा खानोलकर, प्रविण ठाकुर, स्मिता घाडी यांचे मार्गदर्शन लाभले.









