वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
भारताचा स्टार क्रिकेटर दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कार्तिकने 1 जून रोजी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सोशल मीडियाद्वारे ही घोषणा केली. दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळला. यानंतर आरसीबीच्या खेळाडूंनी त्याला ‘गार्ड ऑफ ऑनर‘ दिला होते. यावेळी कार्तिकच्या निवृत्तीचा अंदाज सर्वांना आला होता, वाढदिनी स्वत: घोषणा करत क्रिकेटला अलविदा केला आहे. ज्यांनी क्रिकेटमधील हा प्रवास आनंददायी बनवला, त्या सर्व कोच, कॅप्टन, निवड समितीचे सदस्य, संघातील सहकारी आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांचे यावेळी कार्तिकने आभार मानले.









