वृत्तसंस्था / हाँगकाँग
येथे 7 नोव्हेंबरपासून खेळविल्या जाणाऱ्या हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत भाग घेणाऱ्या भारतीय संघाचे नेतृत्व माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज दिनेश कार्तिक याच्याकडे सोपविण्यात आले आहे.
दिनेश कार्तिकला आंतरराष्ट्रीय सामन्यांचा मोठा अनुभव तसेच कर्णधारपदाची जबाबदारी आणि आक्रमक फलंदाजीचा अनुभव असल्याने त्याच्याकडे कप्तानपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. क्रिकेट हाँगकाँग चायनाचे प्रमुख बुर्जी शेरॉफ यांनी दिनेश कार्तिकचे खास स्वागत केले आहे. या स्पर्धेत शौकिनांना आक्रम फलंदाजीचे दर्शन होत असल्याने या स्पर्धेला चांगलाच प्रतिसाद लाभत आहे.









