वृत्तसंस्था / ब्रिस्बेन
येथे सुरू असलेल्या ब्रिस्बेन खुल्या पुरुष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेत विद्यमान विजेता बल्गेरियाचा ग्रिगोर डिमिट्रोव्हने दुखापतीमुळे उपांत्यफेरीतून माघार घेतली आहे. डिमिट्रोव्हच्या माघारीमुळे 23 वर्षीय लिहेकाने एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.
लिहेका आणि डिमिट्रोव्ह यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना 6-4, 4-4 अशा स्थितीत असताना डिमिट्रोव्हला स्नायु दुखापतीची समस्या सुरू झाली. त्याला पायामध्ये वेदना जाणवू लागल्याने त्याने हा सामना अर्धवट सोडला. लिहेकाने गेल्या वर्षी अॅडलेड टेनिस स्पर्धा जिंकली होती.









