वृत्तसंस्था / अहमदाबाद
मार्च तिमाहीत डिमार्टने आपल्या महसुल कमाईत 20 टक्के इतकी वाढ दर्शवली असल्याची माहिती आहे. कंपनीने 12393 कोटी रुपयांचा महसूल सदरच्या तिमाहीत प्राप्त केला आहे. तिमाही निकालानंतर कंपनीच्या समभागात 3.73 टक्के इतकी वाढ होऊन समभाग 4626 रुपयांवर पोहचला होता.
कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 10,824 कोटी रुपयांच्या वाढीसह 3 लाख 1 हजार 29 कोटी रुपयांवर पोहचले होते. ऑक्टोबर 2021 मध्ये डिमार्टचे बाजार भांडवल मूल्य 3 लाख कोटी रुपयांवर होते. यंदा मार्चअखेरच्या तिमाहीत 12393 कोटी रुपये महसूलरुपात प्राप्त केले. मागच्या वर्षी समान अवधीच्या तुलनेत 19 टक्के अधिक महसूल प्राप्त केला आहे. याआधीच्या वर्षात मार्चच्या तिमाहीत 10337 कोटी रुपये प्राप्त केले होते.









