उपसरपंचपदी सुफला चोपडेकर. दोघांचीही बिनविरोध निवड.
डिचोली/प्रतिनिधी
मये मतदारसंघातील सर्वात महत्वाच्या मये वायंगिणी या पंचायतीच्या सरपंच व उपसरपंचांची बिनविरोध निवड झाली. सरपंचपदी दिलीप शेट यांची तर उपसरपंच म्हणून सुफला चोपडेकर यांची निवड झाली. भाजप समर्थक मंडळाची या पंचायतीवर वर्णी लागली.
पंचायत कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीस पंचसदस्य सीमा आरोंदेकर, विद्यानंद कारबोटकर, सुफला चोपडेकर, कनवी कवठणकर, वासुदेव गावकर, दिलीप शेट, विशांत पेडणेकर, कृष्णा चोडणकर, विनीता पोळे, वर्षा गडेकर व सुवर्णा चोडणकर यांची उपस्थिती होती.
अर्ज सादर करण्याच्या मुदतीत सरपंचपदासाठी दिलीप शेट यांचा व उपसरपंचपदासाठी सुफला चोपडेकर यांचा प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
मये पंचायत क्षेत्रात अनेक विषय प्रलंबित आहेत. त्या सर्व विषयांकडे आमदारांच्या सहकार्याने लक्ष घालताना ते मार्गी लवले जाणार आहे. विविध विकासकामांचा पाठपुरावा करून त्या हातावेगळे करणे तसेच गावातील कचऱयाचा मोठा विषय सोडविण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन नियोजन करणे यावर भर दिला जाणार आहे, असे यावेळी सरपंच दिलीप शेट यांनी सांगितले. आमदार प्रेमेंद्र शेट यांनी नवीन सरपंच, उपसरपंच व पंचायत मंडळाचे अभिनंदन केले. व आपला सर्वतोपरी पाठिंबा सर्व कामांना असणार, असे सांगितले.









